Tuesday, 6 June 2023

वेळ

इथे वेळच नाही कुणाला कोणाशी काही बोलायचा.

स्वतःचे सुख शोधताना, दुसऱ्याच्या दुखण्यात सलायचा.

ओळखी वाढत गेल्या, नाती जोडत गेली,

जुन्या दुरावलेल्या नात्यासाठी, जीव मात्र सलायचा.

आता कुठे आहे वेळ एवढा मागे वळून पाहायचा?

 तूफान

आठवते अजून ते अव्यक्त, अबोल,

निळ्या डोळ्यांचे कोवळे तूफान

नजरेस नजर भिडवण्याचा, ना देई कुणा मान.

हरपले निळ्या नभाचे, पाहून त्याला भान.

जगण्यात होती त्याच्या, एक वेगळीच शान.

 

अवचित काळ्या ढगांचे, घोंगावले आणि एक तूफान,

फेर धरी भोवती, भारावले मध्ये निळे तूफान.

झाले एकजीव दोघे, शांत जाहले सारे रान,

रमले एकमेकात दोघे, विसरून भान.

 

निळ्या रंगाची निळाई, जरि असे ते लहान,

काळ्या रंगाची कटुता, सोडून निघाले हे तूफान.

संपला अव्यक्त-अबोला, मुक्त होई पानोपान,

सोबतीस फक्त आता, छोटे अजून एक “लाडके तूफान”.

 दिवाळी 

ऋतु बदलला निसर्गाचा सुवास बदलला,

लक्ष्मीच्या पदस्पर्शाने, दिवाळीचा सण आला,

रांगोळी सजली, दिव्यांचा झगमगाट झाला,

घरोघरी पहाटे गोविंदाचा जयघोष झाला,

सातवीनाच्या कडू घोट घेताना,

ओल्या गूळ पोहयानचा सुगंध आला,

घरे सजली, अंगणे सारवली शेणाने,

कोंकणी मनात मनात आनंद भरून राहिला.

घ्या आनंद दिवाळीचा, सण असे हा आनंदाचा.

 

ओढ नसेल तर सोड म्हणावे,

जोड नसेल तर तोड म्हणावे,


“लोड” नसेल तर ओढ म्हणावे,

दुखणाऱ्या फोडाला फोड म्हणावे


चूक असेल तर खोड म्हणावे.

ऐकत नसेल तर झोड म्हणावे.


सहज मिळाले तर गोड म्हणावे.

मोड नसेल “ धर रोड ” म्हणावे,

 कोंकण 

भरारणाऱ्या मुक्त पाखरासाठी,

एक मोकळा आसमंत,

खळाळणाऱ्या पाण्याला नाही उसंत,

फेसळणाऱ्या लाटांशी जुळेल नातं ,

कोंकणी पाहुणचार,

कराल तुम्ही पसंत,

जसा देश माझा सुंदर,

तसा महाराष्ट्र ,

तेथेच पायथ्याशी,

रांगतो  कोकणचा रंगमंच

घ्या भरारी, फडफडवा पंख

जोडा नाते कोंकण ट्रॅव्हल क्लब बरोबर

खुणावतो कोकणचा निसर्गमंच !

 

 गुरुजी

मी पाहिलेले, अनुभवलेले माझे प्रकाश गुरुजी

ज्याना शाळेत येताना, देवळात खेळणारी मुले पटापट वर्गात पळायची, ते गुरुजी..

वर्गात धाकाने शिस्त लावणारे गुरुजी..

खांदावर बंदूक घेऊन माकडांना हुसकाऊन लावणारे गुरुजी.....

शिकारीत कायमच सातत्याने सावध टिपणारे गुरुजी..

कामगारांसोबत बागेत आकडी कोयता लावून काम करणारे गुरुजी..

नारायण गौतमेश्वराच्या देवळात प्रत्येक कार्यक्रमात असणारे गुरुजी..

देवळातील दहीकाल्याला काठीने हंडी फोडण्याचा मान असणारे गुरुजी..

होळीला खणखणीत आवाजात गाऱ्हाणे सांगणारे गुरुजी.. 

सार्वजनिक कामात सर्वाना प्रेमाची साथ देणारे गुरुजी..

आर्थिक आणि इतर मदत करताना मोकळा हात असलेले गुरुजी..

आपल्या वाड्यातील सर्व माणसांची काळजी घेणारे गुरुजी..  

बजाजची चेतक स्कूटर चालवणारे गुरुजी..

त्याकाळात एकमेव ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असलेले गुरुजी..

शनिवारी मराठी रविवारी हिन्दी पिक्चर दूरदर्शनचे ज्यांच्या घरी बघायला आम्ही जायचो ते गरूजी..

माझ्या कलेला प्राधान्य देणारे गुरुजी...

घरचा गणपती मला बनवण्याचा मान देणारे गुरुजी..

वेंगुर्ल्याच्या दोन नंबर शाळेत आपला ठसा उमठवणारे गुरुजी..

सर्वांशी मिळून मिसळून वागणारे गुरुजी..

असा हा रांगडा माणूस..

पण .. अनाहूत पणे आलेल्या आजाराने नाराज झालेले गुरुजी..

कितीही मानसिक टेंशन असले तरी आनंदाने घरी स्वागत करणारे गुरुजी..

सीमा, स्वप्ना, सिद्धेश आपल्या मुलांना मला भावाचा अधिकार देणारे गुरुजी..

घरी गेल्यावर वाहिनीला प्रत्येकाच्या हातावर काहीतरी गोड द्यायला सांगणारे गुरुजी..

 

हसता हसता आज तुम्ही निघून गेलात गुरुजी..

पण तुमच्या या आठवणी कायम हृदयात साठवून ठेवल्यात प्रत्येकाने गुरुजी..

तुम्ही हवे होतात..

तुम्ही कायमचे हवे होतात आमच्यात, आजही असेच वाटते गुरुजी..

 तू 

माझ्या जगजागण्याची सुरुवात तुझ्या असण्याने व्हावी,

माझ्या अस्ताची  खंत तुझ्या नसण्याने व्हावी