Tuesday, 6 June 2023

 कलाकार 

आपण जीवनाच्या रंगमंचावरचे कलाकार आहोत,

प्रत्येकाला आपला रोल चांगला करायचा आहे,

कोण किती चांगली भूमिका करतो,

हे आपल्यातीलच कलाकाररुपी प्रेक्षकांनीच ठरवयाचेय.

कधी टाळ्यांचा कडकडाट, कधी शिट्या-शिव्या घेत सरायचंय.

आपला रोल किती आणि कसा आहे,

हे मात्र आपल्या वर बसलेल्या दिग्दर्शकाने ठरवायचेय.

आता आपण रंगमंचावर राहायचे

कि प्रेक्षकांत बसायचे हे मात्र आपणच ठरवयाचेय.

No comments:

Post a Comment