तूफान
आठवते अजून ते अव्यक्त, अबोल,
निळ्या डोळ्यांचे कोवळे तूफान
नजरेस नजर भिडवण्याचा, ना देई कुणा मान.
हरपले निळ्या नभाचे, पाहून त्याला भान.
जगण्यात होती त्याच्या, एक वेगळीच शान.
अवचित काळ्या ढगांचे, घोंगावले आणि एक तूफान,
फेर धरी भोवती, भारावले मध्ये निळे तूफान.
झाले एकजीव दोघे, शांत जाहले सारे रान,
रमले एकमेकात दोघे, विसरून भान.
निळ्या रंगाची निळाई, जरि असे ते लहान,
काळ्या रंगाची कटुता, सोडून निघाले हे तूफान.
संपला अव्यक्त-अबोला, मुक्त होई पानोपान,
सोबतीस फक्त आता, छोटे अजून एक “लाडके तूफान”.
No comments:
Post a Comment