Tuesday, 6 June 2023

 सकाळ

तेजस्वी किरणांची सोनेरी सकाळ ,

सूर्य प्रकाशे दूर क्षितिजी,

शुभ्र बगळ्यांची लेउनिया माळ,

दूर सारुनी धुक्याची चादर,

झाले मोकळे आभाळ.

पापणी उघडूनी पाहे आसमंत,

तोडूनिया काळोखाची नाळ,

दवबिंदू थरथरे पानाफुलावर,

कुरबुरे आईच्या कुशीतले बाळ.

चला जागे व्हारे सकळ

झाली सकाळ ! सकाळ !

No comments:

Post a Comment