Tuesday, 6 June 2023

 गुरुजी

मी पाहिलेले, अनुभवलेले माझे प्रकाश गुरुजी

ज्याना शाळेत येताना, देवळात खेळणारी मुले पटापट वर्गात पळायची, ते गुरुजी..

वर्गात धाकाने शिस्त लावणारे गुरुजी..

खांदावर बंदूक घेऊन माकडांना हुसकाऊन लावणारे गुरुजी.....

शिकारीत कायमच सातत्याने सावध टिपणारे गुरुजी..

कामगारांसोबत बागेत आकडी कोयता लावून काम करणारे गुरुजी..

नारायण गौतमेश्वराच्या देवळात प्रत्येक कार्यक्रमात असणारे गुरुजी..

देवळातील दहीकाल्याला काठीने हंडी फोडण्याचा मान असणारे गुरुजी..

होळीला खणखणीत आवाजात गाऱ्हाणे सांगणारे गुरुजी.. 

सार्वजनिक कामात सर्वाना प्रेमाची साथ देणारे गुरुजी..

आर्थिक आणि इतर मदत करताना मोकळा हात असलेले गुरुजी..

आपल्या वाड्यातील सर्व माणसांची काळजी घेणारे गुरुजी..  

बजाजची चेतक स्कूटर चालवणारे गुरुजी..

त्याकाळात एकमेव ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असलेले गुरुजी..

शनिवारी मराठी रविवारी हिन्दी पिक्चर दूरदर्शनचे ज्यांच्या घरी बघायला आम्ही जायचो ते गरूजी..

माझ्या कलेला प्राधान्य देणारे गुरुजी...

घरचा गणपती मला बनवण्याचा मान देणारे गुरुजी..

वेंगुर्ल्याच्या दोन नंबर शाळेत आपला ठसा उमठवणारे गुरुजी..

सर्वांशी मिळून मिसळून वागणारे गुरुजी..

असा हा रांगडा माणूस..

पण .. अनाहूत पणे आलेल्या आजाराने नाराज झालेले गुरुजी..

कितीही मानसिक टेंशन असले तरी आनंदाने घरी स्वागत करणारे गुरुजी..

सीमा, स्वप्ना, सिद्धेश आपल्या मुलांना मला भावाचा अधिकार देणारे गुरुजी..

घरी गेल्यावर वाहिनीला प्रत्येकाच्या हातावर काहीतरी गोड द्यायला सांगणारे गुरुजी..

 

हसता हसता आज तुम्ही निघून गेलात गुरुजी..

पण तुमच्या या आठवणी कायम हृदयात साठवून ठेवल्यात प्रत्येकाने गुरुजी..

तुम्ही हवे होतात..

तुम्ही कायमचे हवे होतात आमच्यात, आजही असेच वाटते गुरुजी..

No comments:

Post a Comment