जगण कसं फुलासारखं असावं,
आयुष्य दिवसभराचेच का असेना,
दिवसभर कसं सुंदर हसावं*.
चिवचिवणार्या चिमण्यांना,
कोण कसली भिती असते?
चिमुटभर दाण्याशिवाय,
त्यांना कसली चिंता असते?
भिरभिरणारी इवलाली पिसे,
बरंच काही सांगून जातात,
लहान असल्यातलं सुखीपण,
थोडक्यान भुरकन दाखवून जातात.
किलबिलती मुक्त पाखरे,
राघु पिजर्यात कलकलतो,
भिरभिरणारे पंख पाहुनी,
जीव बिचारा सलतो.
मी तर पाखरु उंच नभीचे
नाते मजसी काय भूमीचे
वेड मजला निळ्या नभाचे
चंद्र तारे सगे सोयरे.
मनात खुप शब्द असतात
आणि कविता गोंधळते.
समोर विस्कटलेल्या ओळी पाहुन,
मी उरलेली कविता गुंडाळते.
एवढ्या गर्दीत राहायचे, नजरेला नजर रोज भिडते,
तरीही कसं एकटं एकटं राहायचे. पण ओळख होत नाही,
दररोज भिडणार्या नजरेत, एक छानसं smile द्यावं,
अनोळखीपणाचे रहस्य शोधायचे. कसं दोघांना कळत नाही?
उर भरुन यावं,
आभाळ उतरुन यावं,
काटोकाट पूर धरुन यावं,
ढगातलं पाणी सरुन यावं,
आतुरलेल्या या जीवाला,
एक पत्र दुरुन यावं ,
बुडणार्या या जीवाला
टिचभर तिनक्याने तरुन न्यावं.