कोवळ्या लालसर पालवीत,
ओलसर धुक्याच्या गुदगुदीत,
जन्मावं बनून एखादे मूल।।
नाजूक पिवळसर किरणांशी खेळत,
गच्च मिटलेल्या पाकळ्या पसरत,
फुलून जावं एक डोलणारं फूल।।
जळजळणार्या नजरा सोशीत,
तीक्ष्ण नखाचा गोड वार झेलीत,
बनावं लांबसडक वेणीची भूलं।।
तप्त उन्हाचा विस्तव पित,
मुकपणे कोमलता करपवित,
कोमेजता मी, सरणासाठी मात्र असावी धूळ।।
No comments:
Post a Comment