खडकाळ ठेचाळणार्या घाटीत,
तापलेल्या धूळ मातीत,
पाऊलं चालली चव चाखीत।
करवंदीवरच्या पाखरांना हाकित,
जिर्ण शिरडांच्या जाळीत,
आठवणीचे छोटे दगड टाकीत।
डोक्यात विचारांच्या दाटीत,
स्वः स्वःतालाच प्रश्न विचारीत,
पुसावे निरभ्र नभाला भाकींत,
का बरं बसतेस तू माझं भविष्य झाकीत?
No comments:
Post a Comment