गुणगुणत गाणे सुमधुर,
भिरभिरत येई एक भ्रमर।
पाहुन तरुवर सुमन सुंदर,
विसावे हलके तव दलावर।।
जोडूनी कर तो मधुकर,
मागे पुष्पाकडे मध थेंबभर।
लोभस ललना तु धुरंधर,
सातजन्मीचा मी तुझाच प्रियकर।।
थांबून मजसंगे क्षणभर,
जाशील उडून तू दुरवर।
प्रित तुझी रे आहे निर्झर,
सांगे फुल ते होऊन जर्जर।।
ती बघ डुलते कळी तरुवर,
बसशील उद्या तू त्या फुलावर।
आठवशील का त्याक्षणी मज बरं,
देईन सुधा मी तुजं रांजणभर।।
No comments:
Post a Comment