कोवळ्या लालसर फांदीवर,
एक टपोरे फुल फुललेले।।
मऊ निळसर पंखांचे,
त्यावर फुलपाखरु विसावलेले।।
पंख हलवून घाली वारा,
जणू ते फुल थकलेले।।१।।
निळ्या स्वच्छ नभी
एक पाखरु झेपावलेले।।
हळुवार मारी हाक त्याला,
दुर क्षितीज टेकलेले।।२।।
स्तब्ध होते रान सारे,
एक पिपळ सळसळलेले।।
धरणीवर घेई झेप,
एक पान पिकलेले।।३।।
सुन्न होते विचारात डोकं,
ओंजळीत गाल रोवलेले।।
पहाती वाट कुणाची,
वाटे वर डोळे खिळलेले।।
अन् कागदावर गेले साचून,
एक पद्य अर्थ नसलेले।।४।।
No comments:
Post a Comment