एक पाखरु फांदीवरती,
नजर भिरभिरे अवतीभोवती।
सोबतीस आले एक पाखरु,
संगतीने लागले स्वप्ने आकारु।।
सभोतालचे विश्व विसरुनी,
पहात बसली पंख पसरुनी।
घरटे बांधू तुझे नी माझे,
घरकुल आपले राजाराणीचे।।
अचानक तुफानी वादळ उठले,
दोघांनी भितीने डोळे मिटले।।
डोळे उघडले जरा मी माझे,
पाखरु माझे कुठे न दिसले।
थरथरली चोच डोळे भरले,
पाखरु माझे दुर उडून गेले।।
No comments:
Post a Comment