वाळूत सांडते पाऊल खुणा,
मागोवा घेशील कधी पुन्हा।
रोजचाच हा मम खेळ जुना,
लाटा फुसती पुन्हा पुन्हा।।
वाळूचा उभारते स्वप्न महाल,
येशील पुन्हा तू पुसण्या हाल।
अडखळेल रे येथे तुझीच चाल,
असेच तेथेच मी मन घायाळ।।
एकवार तू जरुर हसशील,
नजरेत माझ्या पुन्हा फसशील।
आता फक्त तु माझाच असशील,
सागरी बुडतो बघ सुर्य मिष्कील।।
No comments:
Post a Comment