मृदू हरितपर्णी कोवळा घुमट तो उगावा,
मंद गंधीत लहरीतून लागे,
कळी आगमानाचा सुगावा।
अबोल ते तीचे रुप, त्यात स्वर्ग साठलेला,
पहाता तीला भ्रमराच्या,
मुखी थेंब आठलेला।
नाजूक पुष्पकन्यकेचा श्रृंगार आता सजेल,
कोवळ्या सुर्यकिरणांत,
पाकळ्यांचा साडी ती नेसेल।
सजलेल्या त्या फुलाला, खट्याळ वारा खिजवेल,
नव सुमनाच्या शितल सुगंधी,
सारा आसमंत दरवळेल।
लोभस त्या फुलाची, पाकळी जेव्हा गळेल,
का तीचा ऋणी आसमंत,
तीच्या विरहाने रडेल?
No comments:
Post a Comment