Tuesday, 11 October 2011

खोप

तेव्हा उधाण होते, मन उच्छृंखल पाखराचे,
तेव्हा भरारत होते, नभी हृदय त्या पिसांचे।

होता गोडवा प्रितीत, स्वप्न नाजुक सुखांचे,
होता सखां संगतीस, प्रेम इवल्या जीवांचे।

चिमुकल्या त्या सख्यांचे, जीव सुगंधले मिलनात,
दूर उडून जाई नर राहे मादा एकटी घरट्यात।

संगतीस फक्त आता, श्वेत गोल गोल जीव,
गुंजली सुन्न घरट्यात, चिमुकल्यांची चीवचीव।

माता उडून जाई, मनात भृणांची भूक,
दाणा टिपून आणी, मातृत्व स्नेह परी मूक।

किलबिलती चिमुरडी ती, तोंडे आवासून,
 मुक्या जीवांची मुकी भूक, माता पुरवे कसून।

भिरभिरती इवलाले पंख, उडून नभात जाती,
उरली गवताची खोप, स्मृती राहिली एकांती।

No comments:

Post a Comment