Tuesday, 11 October 2011

चित्र

काळोख्या रात्री रेखले, एक चित्र काळोखाचे।
काळ्या रंगात रंगले, काळे केस कुंचल्याचे।।

काळी झोपडी झोपली, रात्र काळ्या अवसेची।(अमवास्येची)
काळी सावली करते, राखण काळ्या मळ्याची।।

काळी प्रतिमा हलते, काळ्या उंच झाडाची।
काळे शरीर शहारे, सळसळ काळ्या पानांची।।

काळे श्वापद घेई, चाहुल काळ्या भक्ष्याची।
काळ्या कानात गुंजली, कींकाळी काळ्या पक्ष्याची।।

काळी रात्र संपली, झाले चित्र काळोखाचे।
काळा कॅनव्हास रंगला, चित्र काळ्या काळोखाचे।।

No comments:

Post a Comment