उंच उंच घरात राहायचे, अन्
बाल्कनीतून झोपड्यांचे
मशरुम सारखे जंगल पाहायचे।
धडधडत्या ट्रेनमधून धावायचं, अन्
गळ्यापर्यंत भरलेल्या मार्केटमध्ये
वर नाक करुन पोहायचे।
दिवसभर राबायचं, अन्
रात्री कुढीला टेकण्यासाठी,
दहा बाय दहाच्या चौकटीत शिरायचे।
कसं कसं छान जगायचं, अन्
पिंजर्यात राहून भरारीसाठी
निळं मोकळं आभाळ शोधायचं।
awosome
ReplyDeletevisit my blog
ReplyDeletejoshnilu.blogspot.in
👌❤️👌
Delete